NGCPR कार्यशाळा दिनांक 01/08/2024

रयत शिक्षण संस्थेचे,
न्यू इंग्लिश स्कूल पळशी.
ता. खंडाळा जि. सातारा.
Nauroji Godrej Center For Plant Research (NGCPR)

कार्यशाळा -
ठिकाण :- अजनुज फार्म 
दिनांक :- 01/08/2024

विषय- Communication, Education And Public Awareness For Climate Action and Biodiversity Conservation.

प्रशिक्षणार्थी शिक्षक- श्री.हेमकांत शंकरराव किरवे (उपशिक्षक)

मार्गदर्शक-१) सौ.क्रांती यार्दी मॅडम
               २) श्री. कुंभार सर
               ३) श्री. रवी रैनाक सर

अहवाल -
          गुरुवार दिनांक 01/08/2024 रोजी सकाळी 10:00 ते 4:00 या वेळेमध्ये अजनुज फार्म येथे NGCPR  मार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेची सुरुवात ही शिक्षकांच्या कृतियुक्त सहभागाने झाली. यामध्ये हवामान बदलासाठी कारणीभूत घटक  या विषयावर चर्चा करण्यात आली. वाढते नागरीकरण, वाढती वृक्षतोड, औद्योगिकीकरण तसेच विजेचा वाढता वापर हे घटक हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतात याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

फूट प्रिंट व हँड प्रिंट -
         फूट प्रिंट व हँड प्रिंट प्रशिक्षणार्थींना समजावून सांगण्यासाठी एक कृती घेण्यात आली. या कृतीमध्ये एक प्रश्नावली शिक्षकांना देण्यात आली की ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 3 पर्याय देण्यात आले होते. त्या 3 पर्यायांमधून वस्तुस्थिती ला अनुसरून व्यक्तीसापेक्ष पर्याय निवडणे आवश्यक होते त्याप्रमाणे शिक्षकांनी कृती पूर्ण केली. शेवटी प्रत्येकाचा फूट प्रिंट व हँड प्रिंट नेमका काय आहे हे सौ.क्रांती यार्दी मॅडम यांनी समजावून सांगितले.

' हरित ' शाळा उपक्रम -
            आपली शाळा हरित बनवण्यासाठी कोण कोणत्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हरित शाळेसाठी आवश्यक प्रमुख पाच मुद्दे विचारात घेऊन त्याप्रमाणे शाळांमध्ये पायाभूत बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
      1) पाणी संवर्धन 
      2) आरोग्य आणि स्वच्छता 
      3) कचरा व्यवस्थापन 
     4)जैवविविधता 
     5) ऊर्जा संवर्धन 
या सर्व बाबींची पूर्तता करून आपली शाळा राखाडी, तांबड्या की हिरव्या गटात आहे हे ठरवणे.

विद्यार्थ्यांसाठी Workshops -
     1) Eco-friendly राखी बनवणे
     2) Eco-friendly Cleaners
     3) Eco-friendly गणपती डेकोरेशन 

Field Visit -
        दुपारच्या रुचकर जेवणानंतर Field Visit साठी सर्व शिक्षक प्रशिक्षणार्थी कंद लागवड केलेल्या शेतात जमले व श्री कुंभार सर तसेच श्री रवि रैनाक सर यांनी वेगळ्या ट्युबर संदर्भात माहिती सांगितली.
        पूर्वी मानव खात असलेल्या कंदमुळे व इतर अन्नपदार्थ यांविषयी चर्चा करण्यात आली. 
        सदर कार्यशाळेसाठी खंडाळा तालुक्यातील एकूण 8 शाळांमधून शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

आभार -
        आजची कार्यशाळा शिक्षकांच्या कृतीयुक्त सहभागाने व NGCPR च्या लीडर तसेच सर्व टीम च्या सहकार्याने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. श्री किरवे सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
             
NGCPR 
        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

NGCPR TRAINING (DAY 1)