NGCPR TRAINING (DAY 2)
रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल पळशी. ता. खंडाळा जि. सातारा. Nauroji Godrej Center For Plant Research (NGCPR) कार्यशाळा (दिवस दुसरा) विषय- Communication, Education And Public Awareness For Climate Action and Biodiversity Conservation. (१२ जुलै २०२३) प्रशिक्षणार्थी शिक्षक- श्री.हेमकांत शंकरराव किरवे (उपशिक्षक) मार्गदर्शक- १) सौ.क्रांती यार्दी मॅडम २) श्री. शिवम सर प्रस्तावना- आज बुधवार दिनांक १२ जुलै २०२३ रोजी अजनुज येथे NGCPR मार्फत Biodiversity Conservation बाबत शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये NGCPR मधील प्रमुख शास्त्रज्ञ सौ.क्रांती यार्दी मॅडम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले यावेळी सौ यार्दी मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व NGCPR मधील सर्व सहकाऱ्यांची ओळख करून दिली. क्षेत्रभेट- आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी NGCPR यांच्यामार्फत एका क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रभेटीदरम्यान गोदरेज कंपनीच्या स्वमालकीच्या जागेमधील जैवविविधतेचे दर्शन घेता आले. यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती झ...