NGCPR TRAINING (DAY 1)
रयत शिक्षण संस्थेचे,
न्यू इंग्लिश स्कूल पळशी.
ता. खंडाळा जि. सातारा.
Nauroji Godrej Center For Plant Research (NGCPR)
कार्यशाळा
विषय- Communication, Education And Public Awareness For Climate Action and Biodiversity Conservation.
प्रशिक्षणार्थी शिक्षक- श्री.हेमकांत शंकरराव किरवे (उपशिक्षक)
मार्गदर्शक-१) सौ.क्रांती यार्दी मॅडम
२) श्री.भरूचा सर
३) श्री.बडवे सर
प्रस्तावना-
आज मंगळवार दिनांक 11 जुलै २०२३ रोजी अजनुज येथे NGCPR मार्फत Biodiversity Conservation बाबत शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये NGCPR मधील प्रमुख शास्त्रज्ञ सौ.क्रांती यार्दी मॅडम यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले.
प्रास्ताविकामध्ये एनजीसीपीआर ची उद्दिष्टे संकल्पना स्पष्ट करण्यात आल्या. एन जी सी पी आर ची वैशिष्ट्ये विशद करण्यात आली. वैश्विक तापमान वाढ व जैवविविधतेचे संरक्षण या आगामी काळातील प्रश्नांविषयी सर्व प्रशिक्षणार्थींना अवगत करण्यात आले. वेळी सौ यादी मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व NGCPR मधील सर्व सहकाऱ्यांची ओळख करून दिली.
मान्यवरांचे मार्गदर्शन-
१) श्री भरूचा सर-
आजची कार्यशाळा आणि NEP 2020 यांचा असणारा सहसंबंध श्री.भरूचा सर यांनी समजावून सांगितला. यामध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये पर्यावरण शिक्षण कसे महत्त्वाचे आहे हे सांगितलेले आहे. पर्यावरण शिक्षणामध्ये विद्यार्थी पालक व समाज यांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. भविष्यामध्ये संपूर्ण जगासमोर आव असून उभ्या असणाऱ्या दोन महत्त्वाच्या समस्यांकडे सरांनी सर्व उपस्थित यांचे लक्ष वेधले. यामधील पहिली समस्या म्हणजे वैश्विक तापमान वाढ व दुसरी समस्या म्हणजे जैवविविधतेचा ऱ्हास. या दोन्ही समस्यांबद्दल त्यांचे निराकरण होण्यासंबंधी सर्व सहभागी प्रशिक्षणार्थी व मार्गदर्शक यांनी चर्चा केली. तसेच या समस्या संबंधी उपाय योजना जर आपण आत्तापासूनच सुरू केल्या तरच भविष्यामध्ये आपण चांगल्या पर्यावरणामध्ये राहू शकू अन्यथा सजीव सृष्टी नक्कीच धोक्यात येऊ शकते.
देवराई म्हणजे काय याबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी सरांनी केले. सरांनी केलेल्या सर्वेक्षणाअंती 44 देवराई अस्तित्वात असल्याबाबत उपस्थित त्यांना माहिती देण्यात आली.
२) श्री बडवे सर-
ग्रासलँड मॅनेजमेंट तसेच जंगलांबद्दल बोलत असताना पौराणिक काळापासून जैवविविधतेची जतन कशा पद्धतीने केले जाते याबाबतचा इतिहास श्री बडवे सर यांनी सर्वांसमोर उलगडून दाखवला ब्रिटिश काळापूर्वी व ब्रिटिश काळानंतर वनविभागाने जंगल व जैवविविधता रक्षणासाठी केलेल्या विविध उपायोजना याबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले.
गवताचे विविध प्रकार तसेच ग्रासलँड मॅनेजमेंट याबाबत पीपीटी च्या आधारे सविस्तर व अर्थपूर्ण मार्गदर्शन व आकडेवारी यावेळी सादर करण्यात आली. वनांचे विविध प्रकार तसेच परिसंस्थांचे विविध प्रकार व जैवविविधतेचे रक्षण व त्यासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत सर्व मार्गदर्शक व प्रशिक्षणार्थी यांनी सविस्तर चर्चा केली तसेच भविष्य काळामध्ये कशाप्रकारे जैवविविधता संरक्षणासाठी नियोजन करणे आवश्यक आहे हे देखील ठरवण्यात आले.
आभार-
NGCPR तर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेतील प्रथम पुष्प म्हणजे आजचा दिवस अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. हे शाळेसाठी मार्गदर्शन करणारे श्री भरूचा सर व बडवे सर यांचे सौ.क्रांती यार्दी मॅडम यांनी आभार मानले तसेच कार्यशाळेसाठी उपस्थित असणाऱ्या शिक्षकांचे देखील आभार मानले व कार्यशाळेचा पहिला दिवस संपन्न झाला.
NGCPR
Comments
Post a Comment